लालपरीला अल्प प्रतिसाद

Foto
 कोरोनाच्या अनुषंगाने पन्नास टक्के आसन क्षमतेनुसार एसटी बस सुरू करण्यात आली होती. मात्र, आता कर्नाटक, गुजरात राज्यांच्या धर्तीवर पूर्ण आसन क्षमतेने प्रवासी वाहतूक करण्यासाठी परवानगी देण्यात आल्याने पूर्ण क्षमतेने प्रवासी वाहतूक आजपासून (दि.18) सुरू करण्यात आली आहे.मात्र शासनाने संपूर्ण क्षमतेने बस भरण्यासाठी परवानगी दिल्यानंतर पहिल्याच दिवशी एसटी पूर्ण भरलेली नाही.कोरोनाच्या भीतीने प्रवासी अंतर राखण्यासच प्राधान्य देत आहे.येत्या काळात हळूहळू प्रवासी संख्या वाढेल असे महामंडळाच्या वतीने सांगण्यात आले. 
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पाच महिने शंभर टक्के बंद असलेली बससेवा सामाजिक अंतर राखून 20 ऑगस्टपासून 50 टक्के आसन क्षमतेनुसार सुरू करण्यात आली होती. त्यामुळे एका बसमधून 22 प्रवाशांचीच वाहतूक केली जात होती. एसटी महामंडळाला गुरुवारी (दि.17) शासनाने आदेश काढून पूर्ण क्षमतेने बस सेवा सुरु करण्यास मंजूरी दिली.पूर्वीसारखी प्रवाशांनी खचाखच भरलेली एसटी आता लवकरच दिसेल. मात्र पहिल्याच दिवशी प्रवाशांनी एसटी भरली नसल्याचे मध्यवर्ती बसस्थानकाचे व्यवस्थापक सुनील शिंदे यांनी ’सांजवार्ता’ शी बोलतांना सांगितले.येणार्‍या प्रवाशांना मास्क, सॅनिटाइजर बाबत बाहेरच  सांगून सर्व तपासून आत पाठवले जात आहे.बंदच्या काळात एसटीला 2300 कोटींचा फटका बसला आहे.

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker